महाराष्ट्र सरपंच संसद

10, 11 & 12 December 2017

Venue : MIT World Peace University, Kothrud Pune.

संकल्प (Resolution)

महाराष्ट्र सरपंच संसद हा आगळावेगळा कार्यक्रम महाराष्ट्रातील सरपंचांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. सरपंच हा ग्रामीण शासन ,प्रशासन आणि जनता ह्यांच्या मधला प्रमुख दुवा असतो. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण विकासाला चालना देणे हे प्रमुख काम ग्रामपंचायतींचे असते.

सरपंच, विविध क्षेत्रातले तज्ञ, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे एका व्यासपीठावर येऊन ग्रामव्यवस्था अजून बळकट कशी करता येईल यावर विचारविनीमय करणे हा प्रमुख हेतू महाराष्ट्र सरपंच संसदेचा आहे. सर्वसमावेशक विकास कसा करता येईल, आदर्श ग्रामांची संख्या कशी वाढेल, महात्मा गांधींच्या स्वप्नांतले आदर्श गाव व्यवस्था कशी करता येईल, बदलत्या युगातले तंत्रज्ञानाचे महत्व, पाणी व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवस्थापन अशी अनेक उद्दिष्ठे ठेवून महाराष्ट्र सरपंच संसद आयोजित करण्यात आली आहे.

मा पंतप्रधानांच्या ग्रामीण विकासाच्या सूत्राला अनुसरूनच प्रा राहुल कराड सर यांनी महाराष्ट्रातल्या सरपंचांना एकत्र करून नव्या ग्राम विकासाची नांदी घातली आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरपंच संसद महाराष्ट्रातल्या ग्रामीण विकासात मोलाची भर टाकेल याच हेतूनी आज आपण पहिल्या महाराष्ट्र सरपंच संसदेची सुरवात करूयात.

DATE 10, 11 & 12 December 2017

LOCATION MIT-WPU, Kothrud, Pune.

SPEAKERS Professional Speakers

दृष्टीकोन (Vision)


 • - प्रत्येक तालुका पातळीवर आदर्श ग्राम पंचायतीची उभारणी करणे.

 • - छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर महाराष्ट्र राज्याचा विकास करणे.

 • - नैतिक अधिष्ठानावर तळागाळातील राजकारणाची उभारणी करणे.

अभियान (Mission)


 • - ग्रामविकासासाठी लोकनियुक्त प्रतिनिधी, माध्यमे, शासनसंस्था, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ यांना एकत्र आणणारे व्यासपीठ निर्माण करणे.

 • - महाराष्ट्र सरपंच संसदेची स्वतंत्र ओळख निर्माण करणे.

 • - एम आय टी विश्व शांती विद्यापीठाचे सामाजिक उत्तरदायित्व सुस्थापित करणे.

 • - ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी शोधण्यास मदत करणे.

 • - ग्रामीण समस्यांवर व्यवहार्य उपाययोजना करणे.

 • - ग्रामीण जीवनासाठी महाराष्ट्रातील संतांच्या उपदेशाचा प्रसार करणे.

महाराष्ट्र सरपंच संसदेची उद्दिष्टे (Objectives)


 • - महाराष्ट्र सरपंच संसद ही एम आत टी विश्व शांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष, भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय महिला संसद आणि राष्ट्रीय शिक्षक काँग्रेस आणि स्कूल ऑफ गव्हर्नमेंट चे संस्थापक श्री राहुल कराड यांच्या अभिनव पुढाकाराने साकारास आलेली संकल्पना आहे.

 • - सरपंच हा केंद्र सरकार, राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि गाव यांमधील महत्वाचा दुवा आहे. संसदेत सहभागी सरपंचांना प्रसिद्ध वक्ते आणि तज्ज्ञ हे ग्रामविकास, तंत्रज्ञान, शासकीय योजना, विकास अर्थसहाय्य, शेती, प्रशासन आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन करतील.

 • - ग्रामीण भागाचा समग्र दृष्टीने विकास सुनिश्चित करण्यासाठी ही संसद आयोजित केली आहे.

 • - प्रत्येक तालुका पातळीवर आदर्श ग्रामची उभारणी हा सरपंच संसदेचा मानस आहे. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील सत्तेचे विकेंद्रीकरण आणि ग्रामीण सक्षमीकरण या तत्त्वांवर उभारलेली ही आदर्श गावे इतर खेड्यांना मार्गदर्शक ठरू शकतील.

 • - प्रत्येक तालुक्यास स्वतःची अशी स्वतंत्र नैसर्गीक आणि सामाजिक पार्श्वभूमी असते. म्हणून सुशासनाची तत्त्वे राबवताना आदर्श खेड्याचे प्रारूप हे खेड्याच्या तत्कालिक, सर्वकालिक व दूरगामी गरजा ध्यानात घेऊन तयार होणे गरजेचे आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी ग्रामविकासाला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे.

Contact UsANNA HAJARE SABHA MANDAP

Sr. No. 124, MIT-WPU, Paud road, Kothrud, Pune - 411038, Maharashtra, India

​Email: info@sarpanchsansad.com

Phone no.: +918888815421/22/23